May 14, 2025 1:05 PM May 14, 2025 1:05 PM
18
पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने मरण पावलेल्यांचा आकडा २३ वर
पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने मरण पावलेल्यांचा आकडा २३ वर पोहोचला आहे. यात दुर्घटनेतल्या १३ जणांवर अद्यापही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्थानिक रुग्णालयाने दिली आहे. अमृतसरच्या मजिठा इथे काल ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणाही केली आहे.