June 16, 2024 3:33 PM June 16, 2024 3:33 PM

views 17

भारतीय रेल्वेच्या नावे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद

भारतीय रेल्वेच्या नावे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. विविध ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात अधिकाधिक लोकांच्या सहभागासाठी ही नोंद झाली आहे. रेल्वेने गेल्या २६ फेब्रुवारीला विविध दोन हजार ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं त्यात ४० लाख १९ हजार लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, रेल्वे पादचारी पुलांचं उद्घाटन तसंच नव्या रेल्वेस्थानकांची पायाभरणी करण्यात आली होती.