January 4, 2025 8:43 PM January 4, 2025 8:43 PM

views 8

‘बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर

बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर झाल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विकास आमटे यांनी दिली.    ‘बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार’ ओदिशातले सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन दास आणि कोल्हापूरचे हसन फत्तेखान देसाई यांना संयुक्तपणं दिला जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा ९ फेब्रुवारीला कोथरूड इथल्या गांधी स्मारक निधीच्या सभागृहात होणार आहे.

January 3, 2025 9:54 AM January 3, 2025 9:54 AM

views 9

स्वप्नील कुसाळे, सचिन खिलारी यांना अर्जून पुरस्कार तर दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर, मुरलीकांत पेटकर यांचा जीवनगौरव पुरस्कारनं होणार सन्मान

केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. ऑलिंपिकमधे दोन पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश, पॅरा ॲथलिट प्रवीणकुमार आणि हॉकीपटू हरमनप्रित सिंह यांना, यंदाचा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार, तर नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झ...

August 19, 2024 10:15 AM August 19, 2024 10:15 AM

views 8

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्कारासाठी प्राध्यापिका रोहिणी गोडबोले आणि डॉक्टर अजय सूद यांची, तर डॉक्टर कमला सोहोनी पुरस्कारासाठी डॉक्टर माधव गाडगीळ आणि डॉक्टर महताब बामजी यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड इथं 16 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत भरणाऱ्या 59व्या वार्षिक अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.