September 2, 2024 8:13 PM September 2, 2024 8:13 PM

views 6

LIC विविध सुधारणा करण्यासाठी सर्व योजना मागे घेत असल्याचं वृत्त बनावट

येत्या महिनाअखेरपर्यंत LIC अर्थात जीवन वीमा महामंडळ विविध सुधारणा करण्यासाठी सर्व योजना मागे घेत असल्याचं वृत्त बनावट असल्याचं केंद्र सरकारनं कळवलं आहे. यासंदर्भात समाज माध्यमांवर पसरवली जात असलेली माहिती बनावट असल्याचं पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट झालंय.

June 25, 2024 3:11 PM June 25, 2024 3:11 PM

views 14

कोणताही प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी पॉलिसीधारकांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा- एलआयसी

विमा पॉलिसी महामंडळाला समर्पित करण्यासाठी काही संस्थांकडून दिल्या जात असलेल्या प्रस्तावांबाबत भारतीय आयुर्विमा महामंडळानं स्पष्टीकरण दिलं आहे. अशा संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा आणि उत्पादनांशी आपला कसलाही संबंध नसल्याचं महामंडळानं सांगितलं आहे. असा कोणताही प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी पॉलिसीधारकांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन एलआयसी नं केलं आहे.