December 24, 2025 1:00 PM

views 26

लिबियाचे लष्करप्रमुखांचा विमान अपघातात मृत्यू

लिबियाचे लष्करप्रमुख मोहम्मद अली अहमद अल हद्दाद आणि चार जणांचा तुर्किएची राजधानी अंकारा इथं काल विमान अपघातात मृत्यू झाला. ते तुर्किएवरून लिबियाला परतत असताना हा अपघात झाला. ही दुखद घटना असल्याचं लिबियाचे प्रधानमंत्री अब्दुल हमिद दबेबाह यांनी म्हटलं आहे.  लष्करी अधिकारी अल फितौरी गरिबील, मोहम्मद अल कतारी, हद्दाद यांचे सल्लागार मोहम्मद अल अस्वी दियाब आणि लष्करी छायाचित्रकार मुहम्मद ओमर अहमद महजौब यांचा मृतांमधे समावेश आहे. याशिवाय विमानातल्या तीन कर्मचाऱ्यांचाही यात मृत्यू झाल्याचं तुर्किएनं म्हट...

August 7, 2024 9:04 AM

views 25

युनायटेड किंग्डमच्या दंगलग्रस्त भागात प्रवास न करण्याची भारतीय उच्चायुक्तालयाची सूचना

युनायटेड किंग्डममधल्या गेल्या काही दिवसांतल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्या देशात प्रवासाला जाताना सतर्क राहून काळजी घेण्याचा सल्ला लंडनच्या भारतीय उच्चायुक्तालयानं दिला आहे.   भारतीयांनी युकेमध्ये येण्यापूर्वी इथल्या स्थानिक बातम्या आणि स्थानिक सुरक्षा संस्थांनी दिलेल्या सूचना लक्षात घ्याव्यात आणि निदर्शनं सुरू असलेल्या भागात प्रवास टाळावा असं उच्चायुक्तालयानं जारी केलेल्या सूचनेत नमूद केलं आहे. दरम्यान, भारतीयांनी लिबियामध्ये अनावश्यक प्रवास टाळावा अशी सूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालया...