November 18, 2025 7:38 PM November 18, 2025 7:38 PM

views 14

बिबट्याच्या वाढत्या हल्याच्या घटनांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राज्यात बिबट्यांकडून माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. माणसांवर बिबट्याचे हल्ले होण्याच्या वाढत्या घटनांबाबत आज मंत्रालयात मुख्यमंत्री  फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी दोन रेस्क्यू सेंटर सुरु करणे,पोलिस आणि वनविभागाची गस्त तसंच रेस्क्यू टीम आणि वाहनांची संख्या वाढवणे, बिबट्यांना पकडण्यासाठी ड्रोनचा वापर, नरभक्षक...

May 29, 2025 8:16 PM May 29, 2025 8:16 PM

views 14

भंडारा जिल्ह्यात अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं बिबट्या ठार

भंडारा जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या कोकणागड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं बिबट्या जागीच ठार झाला. धारगाव परिसर हा जंगलव्याप्त असून परिसरात नेहमी वन्य प्राण्यांचा वावर असतो.    बिबट्या रस्ता ओलांडत काल रात्री साडेआठवाजता  त्याचा मृत्यू झाला असून याची माहिती वन विभागाला देण्यात आली. बिबट्याचा मृतदेह गडेगाव येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.