September 30, 2025 7:12 PM September 30, 2025 7:12 PM
13
शांततापूर्ण वातावरण असल्यामुळे लडाख लेहमध्ये सार्वजनिक निर्बंध शिथिल
लडाखमध्ये लेह इथे आज शांततापूर्ण वातावरण असल्यामुळे सार्वजनिक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल झाल्यामुळे लेहमध्ये स्थानिक नागरिकांनी किराणा, जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला खरेदी केला. तसंच, बांधकामप्रवण क्षेत्रावर कामगारांनी त्यांचं काम पुन्हा सुरू केलं. लेहमध्ये इतर निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरीही शैक्षणिक संस्था बंद असून अद्याप इंटरनेट सुविधाही बंद ठेवण्यात आली आहे.