July 12, 2024 3:18 PM
28
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान सुरू
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत २४६ आमदारांनी मतदानं केलं आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून त्यानंतर संध्याकाळी लगेच मतमोजणी होणार आहे. सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदान कशाप्रकारे करावं, पसंतीक्रम कसा ठेवायचा याच्या सूचना आपापल्या आमदारांना दिल्या. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचे बारा उमेदवार रिंगणात आहेत. विजयी होण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची २३ मतं मिळणं आवश्यक आहे. दुपारी चार वाजेपर्...