July 11, 2025 7:03 PM July 11, 2025 7:03 PM
7
महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानपरिषदेतही आवाजी मतदानानं मंजूर, महाविकास आघाडीचा विरोध
महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानपरिषदेनं आज विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत आवाजी मतदानानं मंजूर केलं. या विधेयकाला काल विधानसभेची मंजुरी मिळाली होती. आज गृहराज्यमंत्री योगेश नाईक यांनी हे विधेयक विधानपरिषदेत मांडलं. हा कायदा नागरिकांच्या संरक्षणासाठी आणला असल्याचं सांगून यामागची सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी या विधेयकाला विरोध केला. नक्षलवाद, दहशतवादाला डावी किंवा उजवी विचारसरणी नसते. हा ...