December 6, 2024 7:41 PM December 6, 2024 7:41 PM

views 20

विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांचा शपथविधी

भारतीय जनता पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज राज्य विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष डॉ नीलम गोऱ्हे तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. उद्यापासून ९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून काम पाहतील. या अधिवेशनात ते २८८ नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांना पदाची शपथ देतील आणि ९ डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेत...

July 12, 2024 3:28 PM July 12, 2024 3:28 PM

views 21

राज्याच्या वित्तव्यवस्थेचा २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांचा अहवाल विधानसभेत सादर

मूळ अर्थसंकल्पातल्या तरतुदींइतका खर्च झालेला नसताना राज्य सरकारनं पुरवणी मागण्या मांडल्या. हे प्रकार टाळण्यासाठी योग्य अर्थसंकल्पीय मार्गांचा अवलंब करायला हवा असं निरीक्षण कॅग अर्थात नियंत्रक आणि लेखापालांच्या अहवालात नोंदवलं आहे. राज्याच्या वित्तव्यवस्थेचा २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षांचा अहवाल विधानसभेत आज सादर झाला. त्यात हे निरीक्षण नोंदवलं आहे.   राज्य सरकारच्या मालकीच्या सातत्यानं तोट्यात असलेल्या कंपन्यांचा कारभार सुधारत नसेल तर त्या कंपन्या बंद करण्याची शिफारसही कॅगनं केली...