November 9, 2025 12:40 PM November 9, 2025 12:40 PM

views 15

न्याय, समता आणि कायदा सक्षमीकरणाची भावना साजरी करण्याचं नितीन गडकरी यांचं आवाहन

जागतिक कायदे सेवा दिनानिमित्त, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना न्याय, समता आणि कायदा सक्षमीकरणाची भावना साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. हा दिवस आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देतो की, कायद्याची उपलब्धता हा आपला हक्क असून, तो विशेषाधिकार नाही, असं त्यांनी समाज माध्यमवरच्या  पोस्ट मध्ये म्हटलं आहे. नागरिकांनी कायदे सेवा आणि निष्पक्षता समाजाच्या सर्वात वंचित घटकापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे.