March 22, 2025 8:23 PM March 22, 2025 8:23 PM
8
रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलचा लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ला
लेबाननमधून इस्त्रायलवर रॉकेटचा मारा झाल्यानंतर इस्त्रायलनं दक्षिण लेबाननच्या नियंत्रण कक्षावर रॉकेटनं प्रतिहल्ला चढवल्याची माहिती इस्त्रायलनं दिली आहे. नोव्हेंबरमधे युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर अशा पद्धतीचा हा पहिलाच हल्ला आहे. इस्त्रायलच्या संरक्षण दलांना ही कारवाई करायला भाग पाडलं गेल्याचं इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात दोनजण मारले गेले असून ८ जखमी झाले आहेत. लेबानननं मात्र हल्ल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे.