September 29, 2025 1:36 PM September 29, 2025 1:36 PM

views 15

लेबननमधल्या हिजबोला संघटनेच्या तळांवर इस्रायलचा हवाई हल्ला

इस्रायलने लेबननमधल्या हिजबोला संघटनेच्या तळांवर हवाई हल्ला केला.  कफर रेमेन आणि अल जर्मक या भागात मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रं डागण्यात आली. इस्रायलने हिजबोलाच्या शस्रास्त्र तळांवर हल्ला केल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांमधे युद्धबंदी करार झाला होता, तरीही ही  चकमक झडली आहे. गेल्यावर्षी दोन्ही देशात झालेल्या  संघर्षात १७ हजार जण जखमी झाले होते.

January 25, 2025 3:02 PM January 25, 2025 3:02 PM

views 24

युद्धविराम करारामध्ये ६० दिवसांच्या अंतिम मुदतीनंतरही लेबनीज सैन्य अद्याप तैनात

हिजबुल्लाहशी युद्धविराम करारामध्ये निर्धारित केलेल्या ६० दिवसांच्या अंतिम मुदतीनंतर देखील इस्रायली सैन्य दक्षिण लेबनॉनमध्ये राहील, असं इस्रायली सरकारनं म्हटलं आहे. करारानुसार लितानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून हिजबुल्लाहची शस्त्रं आणि सैन्य काढून टाकणं आवश्यक होतं तरीही अद्याप त्यांच्या अटी पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे इस्रायलनं हा निर्णय घेतल्याचं इस्रायली प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. दोन्हीकडच्या सैन्यानं उद्याच्या २६ जानेवारीपर्यंत दक्षिण लेबनॉनमधून माघार घेण्याचं मान्य केलं...

November 27, 2024 1:42 PM November 27, 2024 1:42 PM

views 11

इस्त्रायल आणि लेबनॉन दरम्यान युद्धविराम लागू

इस्त्रायलनं लेबनॉनसह इतर भागात ६० दिवस युध्दविरामाची घोषणा केली आहे. अमेरिकेनं मध्यस्थी केल्यानंतर ही योजना आखण्यात आल्याचं इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं. युध्दविरामा संदर्भात इस्त्रायलच्या मंत्रीमंडळात प्रस्ताव सादर केला गेला आहे. इस्त्रायली सैन्य आणि हिजबुल्ला दरम्यान ६० दिवसांचा हा युध्दविराम असेल. लेबनॉनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या कराराला आधीच पाठिंबा दर्शवला आहे. मात्र हिजबुल्लाहनं कराराचं उल्लंघन केल्यास त्वरित प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशाराही नेतन्याहू यांन...

October 14, 2024 10:18 AM October 14, 2024 10:18 AM

views 11

दक्षिण लेबेनॉनमधील शांती सेना दूर हलवण्याची इस्रायलची विनंती

संयुक्त राष्ट्र संघाच्या दक्षिण लेबेनॉनमधील शांती सेना तिथून दूर हलवण्याची विनंती इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेजामीन नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्र संघांचे अध्यक्ष आंतोनियो गुटेरास यांना काल केली.   गेल्या काही दिवसांत इस्रायलने लेबेनॉन मध्ये केलेल्या गोळीबारात शांतीसेनेचे पाच जवान जखमी झाले,मात्र तरीही शांतीसेनेने मागे हटण्यास नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही विनंती करण्यात आली आहे. इस्राएल आणि लेबेनॉन मधील संघर्षात शांतीसेनेची हानी होऊ नये हा या विनंतीमागचा उद्देश आहे.

October 3, 2024 1:29 PM October 3, 2024 1:29 PM

views 10

दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लासोबत झालेल्या संघर्षात इस्रायलचे ८ सैनिक ठार

दक्षिण लेबनॉनमध्ये काल हिजबुल्लासोबत झालेल्या संघर्षात इस्रायलचे आठ सैनिक ठार झाल्याचं इस्त्रायलच्या सैन्यानं सांगितलं आहे. इस्रायलनं सैनिकी कारवाई केल्यानंतर उत्तरादाखल हिजबुल्लानं हा हल्ला केला. एका व्हिडिओ संदेशात इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी याबाबत शोक व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, या हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल. इराणलाही याचे परिणाम भोगावे लागतील. इस्रायलची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचही त्यांनी वचन दिलं. इस्रायली हवाई दलाने बैरूतच्या दक्षिणेकडील उपनगरातील ह...

September 28, 2024 2:33 PM September 28, 2024 2:33 PM

views 9

लेबननची राजधानी बैरुतमधील अनेक नागरी वसाहतींवर हवाई हल्ले

इस्रायलच्या फौजांनी काल लेबननची राजधानी बैरुतमधील अनेक नागरी वसाहतींवर हवाई हल्ले केले. इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबोल्हा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह यांच्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं इस्रायली आणि अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. इस्रायली प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यन्याहू यांच्या संयुक्त राष्ट्रसंघातल्या भाषणानंतर थोड्याच वेळात हे हल्ले करण्यात आले. हसनच्या केंद्रीय मुख्यालयावर हल्ले करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. हल्ल्याच्या वेळी तो या इमारतीत होता की नाही हे स्पष्...

September 26, 2024 8:44 PM September 26, 2024 8:44 PM

views 11

इस्रायलने लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ६०० पेक्षा जास्त जण ठार

इस्रायलने लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात सहाशे पेक्षा जास्त जण ठार झाले आहेत. हिजबुल्लाहने इस्रालवर क्षेपणास्त्राचा मारा करत या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिका, फ्रान्स आणि मित्र राष्ट्रांनी इस्रायल-लेबनन सीमेवर २१ दिवसांचा युद्धविराम घ्यावा, अशी मागणी केली आहे. अमेरिका, फ्रान्ससह युरोपियन युनियन, जर्मनी, सौदी अरेबिया, कतर आणि संयुक्त अरब अमिराती यांनी हे निवेदन केलं आहे. तर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामीन नेत्यानाहू यांच्या कार्यालयानं इस्रायल संरक्षण दलाला अधिक जोमाने लढण्याचे निर...

September 26, 2024 2:37 PM September 26, 2024 2:37 PM

views 18

हिजबुल्लाह आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं बैरुतमधल्या भारतीय दुतावासाचं आवाहन

हिजबुल्लाह आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं आवाहन बैरुतमधल्या भारतीय दुतावासाने केलं आहे. पश्चिम आशियाई देशात प्रवास करू नये आणि लेबनन तात्काळ सोडावं असंही भारतीय दुतावासाने म्हटलं आहे. ज्यांना तिथं राहणं आवश्यक आहे त्यांनी आवश्यकता नसेल तर बाहेर पडू नये असंही दुतावासाने म्हटलं आहे. दरम्यान, इस्रायलने लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ५५८ जणांचा मृत्यू झाला असून अठराशे जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ५० बालकांचा समावेश आहे.

September 23, 2024 8:24 PM September 23, 2024 8:24 PM

views 4

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार झाले असून ७२७ जण जखमी झाले आहेत. यात बालकं, महिला, आणि आरोग्यसेवकांचा समावेश असल्याचं लेबननच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. लेबननमधल्या ३०० ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती इस्रायली सैन्यानं दिली आहे.    दुसऱ्या बाजूला, हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेनं इस्रायलच्या उत्तर भागातल्या लष्करी तळांवर आणि रसद गोदामांवर क्षेपणास्त्र डागली आहेत. इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं हिजबुल्लाहनं म...

September 21, 2024 2:26 PM September 21, 2024 2:26 PM

views 10

लेबनॉनमध्ये सक्रीय असलेल्या हेजबोल्ला दहशतवादी संघटनेचा म्होरक्या इब्राहिम अकील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार

लेबनॉनमध्ये सक्रीय असलेल्या हेजबोल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या इब्राहिम अकील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या बातमीवर हेजबोल्लानं शिक्कामोर्तब केलं आहे. दाहियेह भागात इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १४ जण ठार, तर ६६ जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिली. दाट लोकसंख्येच्या भागात इस्रायलनं केलेल्या या कारवाईचा लेबनॉनचे प्रधानमंत्री नजीब मिकाती यांनी निषेध केला आहे. प्रत्युत्तरादाखल हेजबोल्लानं इस्रायलच्या दिशेनं शंभरपेक्षा जास्त क्षेपणास्त्रं डागली. या हल्...