November 1, 2024 10:10 AM November 1, 2024 10:10 AM

views 19

दीपावलीच्या प्रकाश पर्वानिमित्त देशभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण

दीपावलीच्या प्रकाश पर्वानिमित्त देशभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी आकाश कंदील, पणत्या, विजेच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई, रांगोळ्या, या बरोबरीनं अभ्यंग स्नान, फराळाच्या पदार्थांची मेजवानी असं चैतन्याचं वातावरण आहे.   आज संध्याकाळी होणाऱ्या लक्ष्मी पूजनासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. दिवाळीच्या निमित्तानं अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजनही ठीक ठिकाणी केलं जात आहे. महाराष्ट्रात पुणे मुंबईसह सर्वच शहरात दिवाळी पहाट कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे.