July 7, 2024 7:57 PM July 7, 2024 7:57 PM

views 17

लातूर : वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक दिंडीत सहभागी

लातूरच्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या विवेकानंद रुग्णालयामार्फत गेल्या १८ वर्षांपासून आषाढी वारीतल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक पायी दिंडीत सहभागी होत असतं. यावर्षीही हे पथक आजपासून १७ जुलै पर्यंत वारकऱ्यांच्या मोफत वैद्यकीय सेवेसाठी रवाना झालं आहे. या पथकात विवेकानंद रुग्णालयाचे २ डॉक्टर, ६ कर्मचारी तसेच रुग्णवाहिकेचा समावेश आहे. या पथकाकडून दिंडीतल्या वारकऱ्यांना गरजेनुसार मोफत उपचार आणि औषधी पुरवली जाणार आहे. 

June 25, 2024 7:56 PM June 25, 2024 7:56 PM

views 8

नीट परीक्षा घोटाळ्यातल्या आणखी एका आरोपीला लातूरमध्ये अटक

नीट परीक्षा घोटाळ्यातल्या आणखी एका आरोपीला लातूर पोलिसांनी अटक केली आहे. संजय जाधव असं या आरोपीचं नाव आहे. त्याला न्यायालयापुढं आज हजर केलं असता न्यायालयानं त्याला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली.   याप्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकूण चार जणांवर गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत त्यापैकी २ आरोपींना अटक केली आहे. नीट परीक्षा देणाऱ्या १२ विद्यार्थ्यांची परीक्षा प्रवेशपत्रं आरोपी संजय जाधव आणि जलीलखान पठाण यांच्या मोबाईलमध्ये आढळून आली आहेत. त्यानुसार ते विद्यार्थी आणि पालकांकडून नीट परीक्...

June 24, 2024 7:49 PM June 24, 2024 7:49 PM

views 15

नीट परीक्षा घोटाळ्यात लातूरमध्ये अटकेत आरोपीला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

    नीट परीक्षा घोटाळ्यात लातूरमध्ये अटकेत असलेल्या एका आरोपीला न्यायालयानं २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. याप्रकरणी ४ जणांविरोधात दहशतवाद विरोधी पथकानं चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातल्या एकाला पोलिसांनी काल अटक केली होती. इतर दोघांची चौकशी सुरू आहे आणि दिल्लीतल्या चौथ्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिस पथक जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

June 17, 2024 6:49 PM June 17, 2024 6:49 PM

views 16

लातूर : अवैध हत्यारं बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक

लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे विभागानं लातूर-तुळजापूर मार्गावरच्या  बेलकुंड इथून एका तरुणाला अवैध हत्यारं बाळगल्याप्रकरणी अटक केली. या तरुणाकडून पोलिसांनी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आणि मॅगझिन जप्त केलं असून त्याच्याविरोधात भारतीय हत्या कायद्या अंतर्गंत भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या युवकाला याआधी एका गुन्ह्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेली असून तो जामिनावर बाहेर आला होता.