January 29, 2025 9:58 AM January 29, 2025 9:58 AM

views 17

लातूरमध्ये कोंबड्यांना बर्डफ्ल्यूची लागण

लातूर जिल्ह्यात उदगीर शहरातल्या रामनगरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू ची लागण झाली आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार रामनगर इथल्या एक किलोमीटर परिसरातल्या कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसंच सहा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

January 29, 2025 9:40 AM January 29, 2025 9:40 AM

views 13

कोल्हापूर, लातूरमध्ये जीबीएसचे रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यातही जीबीएसचे दोन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका १२ वर्षीय मुलीचा आणि ६० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. दोन्ही रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचं, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी सांगितलं.   लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही जीबीएसचे दोन संशयित रुग्ण दाखल झाले होते. तपासणी अहवालात एका रुग्णाला हा संसर्ग नसल्याचं स्पष्ट झालं असून, दुसऱ्या रुग्णाचा अहवाल येणं बाकी आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.उदय मोहिते पा...

December 27, 2024 11:57 AM December 27, 2024 11:57 AM

views 11

लातूरमध्ये मुख्याध्यापकांचं ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन

लातूर इथं उद्या २८ डिसेंबर पासून अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांच्यावतीने दोन दिवशीय मुख्याध्यापकांचं ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन होत आहे.   दोन दिवस असणआऱ्या या संमेलनाचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्ष म्हणून प्राचार्य बाबुराव जाधव तर स्वागताध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे असणार आहेत, अशी माहिती लातूर जिल्हा माध्यमिक व आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख य...

December 26, 2024 10:03 AM December 26, 2024 10:03 AM

views 11

लातूरमध्ये खून प्रकरणी डॉ. प्रमोद घुगेला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

लातूरच्या आयकॉन रुग्णालयाचा प्रमुख डॉ.प्रमोद घुगे याला न्यायालयानं ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आपल्याच रुग्णालयातला कर्मचारी बाळू डोंगरे याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ घुगे याला उत्तराखंडातून अटक करून काल न्यायालयासमोर हजर केलं. या प्रकरणातल्या अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.

October 23, 2024 3:28 PM October 23, 2024 3:28 PM

views 8

लातूर जिल्हा प्रशासनातर्फे आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी

लातूर जिल्हा प्रशासनातर्फे आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत लातूर पोलिसांनी औसा तालुक्यात एकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला असून १५ जणांवर अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. फेक स्पीच; तसंच समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणीही पाच गुन्हे दाखल झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

September 25, 2024 7:41 PM September 25, 2024 7:41 PM

views 10

लातूर जिल्ह्यातल्या मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग

लातूर जिल्ह्यातल्या धनेगाव इथल्या मांजरा धरणातून विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  धऱणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेत विसर्ग कमी किंवा जास्त केला जाण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.  दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली. 

September 22, 2024 6:26 PM September 22, 2024 6:26 PM

views 8

लातूरमध्ये धनगर समाजाचं सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन

धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करायच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आज धनगर समाजानं लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन केलं. अहमदपूरचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडामंत्री संजय बनसोडे, निलंगा इथले भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापुढे आंदोलकांनी हलगी वाजवून त्यांचं लक्ष वेधलं, तसंच घोषणाबाजी केली. तसंच 'धनगड' अशा नामोल्लेखाला आपलं समर्थन असल्याचं पत्रही या आमदारांकडून आंदोलकांनी घेतलं.

September 11, 2024 3:31 PM September 11, 2024 3:31 PM

views 13

लातूर पालिकेतर्फे शहरात घनकचरा व्यवस्थापन

लातूर शहरातल्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नेमलेल्या जन-आधार सेवाभावी संस्थेचं कंत्राट संपल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येत होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी एजन्सी नेमण्याची प्रक्रिया लातूर महानगरपालिका प्रशासनानं सुरू केली आहे. दरम्यान, महानगरपालिकेनं शहरातला  कचरा उचलायला सुरुवात केली असून गेल्या ५ दिवसात १ हजार ६४० मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला आहे. आगामी ८ दिवसात उर्वरित कचरा उचलणार असल्याचं  लातूर महापालिकेनं  स्पष्ट केलं आहे. 

September 4, 2024 8:07 PM September 4, 2024 8:07 PM

views 15

प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं आवश्यक – राष्ट्रपती

  प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं आवश्यक असून, त्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात त्या बोलत होत्या. प्रत्येक क्षेत्रात महिलांची सक्रीय भागीदारी वाढवण्यासाठी बचत गटांची भूमिका महत्वाची असल्याचं त्या म्हणाल्या. राज्य सरकार महिलांचं आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी, महिलांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करावं, आ...

August 14, 2024 8:59 AM August 14, 2024 8:59 AM

views 7

लातूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांवर तिरंगा फडकवून उपक्रमाला सुरुवात

हर घर तिरंगा अभियानांतर्गत लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ध्वज फडकावून या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर काल तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.   हिंगोली इथं नगर परिषदेचे मुख्यधिकारी अरविंद मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'तिरंगा यात्रा' काढण्यात आली. विविध कार्यालयातले अधिकारी कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचं वितरणही करण्यात आलं.   मराठवाडा विभागातल्या हर घर तिरंगा मोहिमेविषयीची...