March 30, 2025 3:31 PM March 30, 2025 3:31 PM

views 13

लातूर पोलिसदलातर्फे मॅरेथॉनचं आयोजन

लातूर पोलिसदलाने आज आयोजित केलेल्या एक धाव सायबर सुरक्षेसाठी या मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रातल्या धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  लातूर जिल्हा क्रीडा संकुलातून तीन किलोमीटर, पाच किलोमीटर  आणि दहा किलोमीटर अशा तीन गटातल्या या दौडीत शालेय विद्यार्थ्यापासून वृद्धांनी  सहभाग नोंदवला. सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने ही मॅरेथॉन आयोजित केल्याची माहिती लातूर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिली.