November 30, 2024 1:31 PM November 30, 2024 1:31 PM
3
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अर्थात यूआयपी अंतर्गत ७ कोटी ४३ लाख लाभार्थ्यांची नोंदणी
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अर्थात यूआयपी अंतर्गत सुमारे ७ कोटी ४३ लाख लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. गरोदर महिलांना तसंच नवजात ते १६ वर्षांपर्यंतच्या मुलांना १२ प्रकारच्या रोगांसाठी या कार्यक्रमांतर्गत जीवनरक्षक लस देण्यात येते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. संकेतस्थळावरल्या नोंदीनुसार १ कोटी २६ लाख लसीकरण सत्रं आयोजित करण्यात आली असून सुमारे २७ कोटी ७७ लाख लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यूआयपीच्...