October 10, 2024 1:59 PM October 10, 2024 1:59 PM
10
२१ वी आसियान-भारत शिखर परिषद आणि १९ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाओसमध्ये दाखल
लाओसची राजधानी व्हिएंतियान इथं होणाऱ्या २१ व्या आसियान-भारत शिखर परिषदेला आणि १९ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लाओसमध्ये पोहोचले. लाओसमधील भारतीय समुदायानं प्रधानमंत्री मोदी यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. भारत-प्रशांत महासागर क्षेत्रातील शांतता, स्थिरता आणि समृद्धी यांच्यावर परिषदेत विचार केला जाईल. तसंच यावेळी आसियान नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकीत आतापर्यंत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दिशेनं झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल आणि भविष्यातील सहकार्य निश्चि...