October 5, 2025 8:16 PM October 5, 2025 8:16 PM

views 16

पश्चिम बंगालमधे भूस्खलनाच्या घटनांमधे २३ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधे मुसळधार पाऊस होत असून भूस्खलनाच्या घटनांमधे आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू  झाला आहे. तिस्ता नदीला पूर आला आहे, राष्ट्रीय महामार्गांवर पाणी साचलं आहे. शेतात आणि घरात पाणी शिरलं आहे. एनडीआरएफची पथकं आपद्ग्रस्त भागात मदतकार्य करत आहेत.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या आपत्तीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे, तसंच बचाव आणि मदतकार्य जलद व्हावं यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. ममता ...

October 5, 2025 1:41 PM October 5, 2025 1:41 PM

views 15

पश्चिम बंगालमधे अतिवृष्टीमुळे किमान २० जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधे मुसळधार पाऊस होत असून भूस्खलनाच्या घटनांमधे किमान २० जणांचा मृत्यू  झाला. तिस्ता नदीला पूर आला आहे, राष्ट्रीय महामार्गांवर पाणी साचलं आहे. शेतात आणि घरात पाणी शिरलं आहे. दार्जिलिंग, कुरेसाँग, मिरिक कालिंपाँग आणि सिक्किममधे जनजीवन विस्कळीत झालं असून एनडीआरएफची पथकं आपद्ग्रस्त भागात मदतकार्य करत आहेत.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. केंद्रसरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि दुर्घटनाग्रस्तांना तातडीने मदत पुरवली जाईल असं प्रधानमं...

July 8, 2025 2:29 PM July 8, 2025 2:29 PM

views 9

नागालँडमध्ये मुसळधार पावसानं भूस्खलन

नागालँडमध्ये संततधार पावसामुळे दिमापूर, निउलँड या जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, असं राज्य आपत्ती प्रतिसाद दलानं सांगितलं आहे. या जिल्ह्यातल्या सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचेही नुकसान झालं आहे. या आठवड्यात नागालँडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे.

September 10, 2024 12:51 PM September 10, 2024 12:51 PM

views 7

हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन

हिमाचल प्रदेशाच्या विविध भागांत काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या अनेक मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. कांगड़ा, मंडी, कुल्लू, ऊना, हमीरपुर, बिलासपुर, सोलन, सिरमौर आणि सिमला इथं हवामान विभागानं जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.