August 27, 2025 8:09 PM August 27, 2025 8:09 PM

views 6

वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात झालेल्या भूस्खलनात आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात झालेल्या भूस्खलनात आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याठिकाणी अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे.   जम्मूमध्ये २४ तासात ३८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या १०० हून अधिक वर्षांत २४ तासांत झालेला हा विक्रमी पाऊस आहे. दोडा जिल्ह्यातही पावसाशी निगडीत दुर्घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे.   या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल राष...

May 30, 2025 1:42 PM May 30, 2025 1:42 PM

views 19

कर्नाटकमध्ये मंगळुरू जिल्ह्यात भूस्खलनात एका मुलीचा मृत्यू

कर्नाटकमध्ये मंगळुरू जिल्ह्यात जोरदार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तर दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मंगळुरू विभागात २ जूनपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

September 30, 2024 7:18 PM September 30, 2024 7:18 PM

views 16

नेपाळमध्ये पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गीक संकटामुळे आतापर्यंत २०५ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये संततधार पावसाने आलेल्या पूर, भूस्खलन यासारख्या नैसर्गीक संकटामुळे आतापर्यंत २०५ जण मृत्यूमुखी पडले आहेत. नेपाळच्या गृहमंत्रालयाचे प्रवक्ते रिषीराम तिवारी यांनी ही माहिती दिली.  विविध नैसर्गीक संकटात २६० जण जखमी झाले आहेत.  पूर आणि भूस्खलन अशा  संकटात सापडलेल्या ४ हजार ५०० नागरिकांना मदत आणि बचाव कार्यातल्या सुरक्षादलांनी  सुरक्षित स्थळी हलवलं आहे. महामार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

July 23, 2024 8:45 PM July 23, 2024 8:45 PM

views 20

इथियोपिया : भूस्खलानात १५५ जणांचा मृत्यू

इथियोपिया इथं भूस्खलानामुळे झालेल्या मृतांची संख्या १५५ झाली आहे. इथिओपियामधल्या गेझे गोफा जिल्ह्यात काल सकाळी हे भूस्खलन झालं होतं. आतापर्यंत महिला आणि बालकांचे मिळून ५५ मृतदेह सापडले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. इथियोपियामध्ये सध्या पावसाळा सुरू असून सततच्या पावसामुळे पूर्व आफ्रिकन देशांमध्ये भूस्खलनाच्या घटना अनेकदा घडत असतात.

July 12, 2024 1:41 PM July 12, 2024 1:41 PM

views 13

नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन बस नदीत वाहून गेल्या

नेपाळमध्ये भूस्खलन झाल्यामुळे दोन प्रवासी बस आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या नदीत वाहून गेल्या. दोन्ही बसमध्ये एकूण ६५ प्रवासी होते, यात ७ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. चितवन जिल्ह्यात नारायणघाट - मुगलिंग पट्ट्यात भूस्खलन झाल्यामुळे या बस त्रिशूली नदीत पडल्या.  यातल्या बीरगंजहून काठमांडूला चाललेल्या बसमध्ये ७ भारतीय प्रवास करत होते. नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलानं घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरु केलं असून प्रधानमंत्री पुष्पकमल दहल यांनी आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीनं करण्याचे निर्देश दिले आहेत.