October 13, 2025 1:26 PM October 13, 2025 1:26 PM

views 44

आयआरसीटीसी घोटाळ्यात राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी आणि मुलगा तेजस्वी यांच्यावर आरोप निश्चित

आयआरसीटीसी घोटाळ्यात  राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव यांच्यावर दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी या तिघांसह अन्य आरोपींवर भ्रष्टाचार, गुन्हेगारी कट आणि फसवणुकीचे आरोप निश्चित केले आहेत.    रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादव हे रेल्वे मंत्री असताना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने २००४ ते २००९ दरम्यान एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यासाठी जमिनीच्या स्वरुपात लाच स्वीकारल्याचा आरोप सी...

May 31, 2025 6:34 PM May 31, 2025 6:34 PM

views 19

नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणातील खटल्याला स्थगिती देण्याची लालू यादव यांची याचिका फेटाळली

सी बी आय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या घोटाळ्यात दाखल केलेल्या खटल्याला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. २००४ ते २००९ या कालावधीत रेल्वे मंत्री पदावर असताना यादव यांनी रेल्वेत नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवत त्याबदल्यात काहीजणांकडून जमिनीचे तुकडे आपल्या कुटुंबियांच्या तसंच नातेवाईकांच्या नावावर हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून यादव यांच्याविरी...

May 25, 2025 7:28 PM May 25, 2025 7:28 PM

views 35

तेज प्रताप यादव यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालु प्रसाद यादव यांनी आपले पुत्र आणि बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. तेज प्रताप यादव याच्या कथित मैत्रिणीसंदर्भातली पोस्ट समाजमाध्यमांवर पसरली होती. त्यानंतर वर्तणुकीच्या मुद्यावरून त्यांना पक्षातून निलंबित करत असल्याचं लालु प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. बिहारचे विरोधी पक्षनेते आणि  लालु प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. सार्वजनिक आयुष्यात जबाबदारीनं वागणं गरजेचं असल्याचं त्...

October 7, 2024 1:45 PM October 7, 2024 1:45 PM

views 10

मनी लाँड्रिंग प्रकरणातील लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

जमिनीच्या मोबदल्यात नोकरी या मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. या प्रकरणी ईडीच्या अगोदर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.   ईडीने १८ सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने लालू यादव आणि इतरांना समन्स बजावलं होतं. २००४ ते २००९ या काळात लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या रेल्वेच्या पश्चिम...