February 20, 2025 3:29 PM February 20, 2025 3:29 PM
35
लेखिका ललिता गादगे यांना काशीबाई फुलारी स्मृति नारायणी पुरस्कार जाहीर
नांदेड जिल्ह्यातल्या गोरठे इथल्या वरद प्रतिष्ठानच्यावतीनं दिला जाणारा यावर्षीचा काशीबाई फुलारी स्मृति नारायणी पुरस्कार लेखिका ललिता गादगे यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पाच हजार रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. गादगे यांची आजवर अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. इंग्रजी भाषेच्या प्राध्यापिका असलेल्या गादगे यांनी लेखन मात्र मराठीतूनच केलं आहे.