October 2, 2025 1:38 PM October 2, 2025 1:38 PM

views 30

माजी प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली

देशाचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या १२१व्या जयंतीनिमित्त देश आदरांजली वाहत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी विजय घाट इथं शास्त्रीजींच्या समाधीस्थळी पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवरांनी लाल बहादुर शास्त्री यांना अभिवादन केलं आहे.