October 2, 2024 7:59 PM October 2, 2024 7:59 PM
4
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे. महात्मा गांधी यांची आज १५५ वी जयंती असून त्यानिमित्त देशासह परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या महात्मा गांधींच्या राजघाट इथल्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली. त्यान...