October 9, 2024 2:45 PM October 9, 2024 2:45 PM

views 21

आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या रासमस गेमके याच्याशी होणार

आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या रासमस गेमके याच्याशी होईल. तर किरण जॉर्ज आज पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत चिनी तैपेईच्या वांग त्झू वेईशी लढत देईल. महिला एकेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधू पहिल्याच फेरीत कॅनडाच्या मिशेल लीक कडून पराभूत झाली. दरम्यन, भारताच्या आकर्षी कश्यप आणि मालविका बनसोड यांनी सोळाव्या फेरीत प्रवेश केला आहे.  

August 6, 2024 3:28 PM August 6, 2024 3:28 PM

views 7

भारतीय बॅडमिंटन विश्वातला खंदा सेनापती : लक्ष्य सेन

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत काल भारताचा एकमेव शिलेदार लक्ष्य सेनचं कास्यपदक अगदी थोडक्यात हुकलं. पहिला गेम जिंकून घेतलेली आघाडी त्याला टिकवता आली नाही आणि त्याचा प्रतिस्पर्धी मलेशियाचा ली झी जिया यानं पुढचे दोन्ही गेम्स जिंकून त्याला हरवलं. लक्ष्यकडे पदकाच्या आशेने बघत असलेल्या सगळ्यांसाठीच हा धक्का होता. आणि ते साहजिकही आहे. पण, ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणारा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू हा मान लक्ष्य सेननं पटकावलाय आणि ही गोष्ट नक्कीच छोटी नाही. चला तर मग, आकाशवाणी म...

August 5, 2024 8:24 PM August 5, 2024 8:24 PM

views 12

पॅरिस ऑलिम्पिक : बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचं कास्यपदक हुकलं

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचं कास्यपदक पटकावण्याचं स्वप्न मलेशियाच्या झी जिया ली याच्यामुळे भंगलं. सुरुवातीचा गेम जिंकून घेतलेली आघाडी लक्ष्य सेनला टिकवता आली नाही आणि ली यानं नंतरचे दोन्ही गेम्स जिंकून सामनाही १३-२१, २१-१६, २१-११ असा खिशात घातला. नेमबाजी स्पर्धेत स्कीट मिश्र सांघिक प्रकारात महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरुका यांचंही कास्यपदक अवघ्या एका गुणानं हुकलं. त्यामुळे भारताला चौथ्या पदकासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे....

August 5, 2024 7:40 PM August 5, 2024 7:40 PM

views 13

पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकिटांचा संच प्रकाशित

पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ आज टपाल विभागानं विशेष तिकिटांचा संच प्रकाशित केला. नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय उपस्थित होते. ऑलिम्पिक आणि या स्पर्धेत उतरलेल्या क्रीडापटूंना भारताचा पाठिंबा दर्शवण्याचा या टपाल तिकीट संचामागचा उद्देश असल्याचं दूरसंचार मंत्रालयानं म्हटलं आहे.

August 5, 2024 1:38 PM August 5, 2024 1:38 PM

views 15

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठी सामना

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनची कांस्यपदकासाठीची लढत मलेशियाच्या झी जिया ली याच्याशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता हा सामना होईल. भारताला या स्पर्धेतलं चौथं पदक मिळवून देण्यासाठी लक्ष्य सेन प्रयत्नशील असेल. याशिवाय नेमबाजी स्पर्धेत स्कीट मिश्र सांघिक प्रकारात महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरुका आज लक्ष्याचा वेध घेणार आहेत. टेबल टेनिस सांघिक प्रकारात उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित करण्यासाठी श्रीजा अकुला, मनिका बत्रा आणि अर्चना कामत आज ...