May 28, 2025 4:50 PM May 28, 2025 4:50 PM

views 8

पालघरचे माजी खासदार लहानु कोम यांचं निधन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, पालघरचे माजी खासदार लहानु कोम यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. लहानु कोम यांनी १९५९ पासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आदिवासी, शेतकऱ्यांचं संघटन बांधण्याचं काम त्यांनी अनेक वर्षे केलं. आदिवासी प्रगती मंडळाचं अध्यक्षपदही त्यांनी अनेक वर्षं भूषवलं. कोम यांच्या पार्थिवावर उद्या तलासरी इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.