December 10, 2025 8:14 PM December 10, 2025 8:14 PM
37
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना योग्य वेळी रुपये देण्याचं राज्य सरकारचं आश्वासन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुपयांचा हप्ता योग्य वेळी देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. लाडकी बहीण योजनेसाठी २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज विभागाने पात्रतेनुसार ग्राह्य धरले आहेत, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आत्तापर्यंत १ कोटी ७४ लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या १२ ते १४ हजार महिलांच्या नावावर पुरुषांची बँक ख...