October 22, 2025 1:26 PM October 22, 2025 1:26 PM

views 25

लडाखमधल्या नेत्यांशी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या उच्चाधिकार समितीची चर्चा

केंद्रीय गृह मंत्रालयाची उच्चाधिकार समिती आज नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर लडाखच्या नेत्यांशी चर्चा करत आहे.  गेल्या महिन्यात लडाखमधे झालेल्या हिंसाचारानंतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर पहिल्यांदाच औपचारिक चर्चा होत आहे. याचर्चेत लडाखचं शिष्टमंडळ राज्याचा दर्जा आणि सहाव्या सूचीत समावेश यासारख्या मागण्या मांडण्याची शक्यता असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  या चर्चेत  कारगिल लोकशाही आघाडी, लेहमधल्या आंदोलनकर्त्यांच्या शिखर संस्थेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.  

October 3, 2025 1:33 PM October 3, 2025 1:33 PM

views 20

लदाखच्या लेह जिल्ह्यात जनजीवन पूर्वपदावर

लदाखच्या लेह जिल्ह्यात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. काही दिवसांपूर्वी हिंसक आंदोलनानंतर तिथं तणाव निर्माण झाला होता. आता प्रशासनानं सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळात संचारबंदी शिथिल केली आहे. मात्र मोबाईल डेटा सेवा अद्याप बंद आहे. शाळा सुरू झाल्या असून बस आणि टॅक्सी वाहतूकही सुरू झाली आहे.   दरम्यान, लदाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेतल्याच्या विरोधात त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या सर्वोच्...

September 26, 2025 8:12 PM September 26, 2025 8:12 PM

views 28

लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक

लडाखमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी सामजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक केली गेली आहे. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा या मागणीसाठी वांगचूक हे उपोषणाला बसले होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५० पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतलं आहे.  दरम्यान सुरक्षेची उपाययोजना म्हणून वांगचूक यांच्या अटकेनंतर लेहमधली मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली आहे, तर ब्रॉडबँड इंटरनेटचा वेगही कमी केला आहे. कारगिलसह इतर शहरांमध्येही जमावबंद...

May 29, 2025 1:38 PM May 29, 2025 1:38 PM

views 16

लडाखमध्ये विकसित कृषी संकल्प अभियानाच्या बसला हिरवा झेंडा

लडाखमध्ये आज विकसित कृषी संकल्प अभियानाच्या बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही बस दोन आठवडे लडाख जिल्ह्यात फिरणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना खरीपपूर्व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या बसच्या माध्यमातून दरदिवशी दीडशे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून लडाखच्या २५ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. या बसच्या माध्यमातून संशोधक, तांत्रिक सल्लागार आणि वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.  

April 23, 2025 6:59 PM April 23, 2025 6:59 PM

views 18

दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ लडाखमधे अर्ध्या दिवसाचा बंद

पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून लडाख इथे अर्ध्या दिवसाचा बंद पाळण्यात आला. कारगिल शहर आणि परिसरातली सर्वं दुकानं बंद होती. या हल्ल्याबद्दल स्थानिकांमधून दुःख व्यक्त करण्यात येत असून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. लडाखमधल्या अनेक नेते आणि संघटनांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

March 14, 2025 11:02 AM March 14, 2025 11:02 AM

views 11

जम्मूकाश्मीर आणि लडाखमध्ये अर्थसंकल्पाच्या पारदर्शक वितरणासाठी समितीची स्थापना

जम्मूकाश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचनेनंतर मालमत्ता, दायित्वे आणि अर्थसंकल्पाचं पारदर्शक वितरण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काल जम्मू काश्मीर विधानसभेत दिली. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अब्दुल्ला बोलत होते. ही प्रक्रिया 30 ऑक्टोबर 2020 च्या अधिसूचनेनुसार केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. समितीच्या बहुतेक शिफारशी आधीच लागू करण्यात आल्या असून सार्वजनिक कर्जाच्या वाटणीबाबत 2 हजार 504 कोटी रुपयांचं आ...

January 23, 2025 11:25 AM January 23, 2025 11:25 AM

views 8

आजपासून लडाखमध्ये हिवाळी क्रीडा स्पर्धांची सुरूवात

खेलो इंडियाच्या या वर्षाच्या हंगामातल्या, हिवाळी क्रीडा स्पर्धांची सुरूवात आज लडाखमध्ये होत आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे.   लडाख मध्ये दुसऱ्यांदा खेलो इंडियाचं आयोजन केलं जात असून, या हंगामाचा दुसरा टप्पा फेब्रुवारीत जम्मू आणि काश्मिरमध्ये होणार आहे.

August 26, 2024 1:17 PM August 26, 2024 1:17 PM

views 16

लडाखमध्ये पाच नवे जिल्हे तयार करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

लडाख या केंद्रशासीत प्रदेशात पाच नवे जिल्हे तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज ही माहिती दिली. नव्या रचनेनुसार लडखमध्ये जास्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे पाच जिल्हे तयार केले जाणार आहेत.

August 22, 2024 7:47 PM August 22, 2024 7:47 PM

views 15

लडाखमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू

लेह लडाखमधल्या डुरबुक उपविभागामध्ये आज सकाळी झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून बावीस जण जखमी झाले आहेत. कर्मचाऱ्यांना एका कार्यक्रमासाठी घेऊन जाणाऱ्या शाळेच्या बसच्या चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. यात सहा जणांचा जागीत मृत्यू झाला तर एका जणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिली आहे.