October 2, 2025 1:32 PM October 2, 2025 1:32 PM
21
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं माजी प्रधानमंत्री दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
माजी प्रधानमंत्री दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना अभिवादन केलं. शास्त्रीजींचं आयुष्य साधेपणा, प्रामाणिपणा आणि नैतिक धैर्याचं उत्तम उदाहरण होतं, वैयक्तिक आयुष्याशिवाय देशाहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून अनेक पिढ्यांना मिळाली असं राधाकृष्णन म्हणाले. शास्त्रीजींची जय जवान जय किसान ही घोषणा देशाच्या उभारणीत महत्त्वाचं योगदान असलेल्या या दोन घटकांमधले अविभाज्य बंध दर्शवते असं ते म्हणाले.