April 16, 2025 1:30 PM April 16, 2025 1:30 PM

views 6

लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश

येत्या २०२८मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार असून त्यासाठी कॅलिफोर्नियाच्या पोमोना इथे एक स्टेडियम बनवण्यात येणार आहे. ही जागा ५०० एकरात पसरलेली आहे. १४ जुलै ते ३० जुलै २०२८ या दरम्यान अमेरिकेत लॉस एंजेलिस इथे ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. यात क्रिकेट प्रकारात महिला आणि पुरुष गटाचे प्रत्येकी सहा संघ खेळणार आहेत.