October 8, 2025 8:06 PM

views 62

बँकेची केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न – SBIचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी

बँकेची केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न असल्याचं स्टेट बँकेचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज फिनटेक फेस्टमध्ये शेट्टी बोलत होते. यूपीआय वापरकर्ते आता डेबिट कार्डाशिवाय कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये रोख रक्कम जमा करू शकणार आहेत. तसंच, कर्जाचा हप्ताही भरणं आणि थर्ड पार्टी व्यवहार करणंही आता याच माध्यमातून शक्य होणार आहे.

November 7, 2024 10:48 AM

views 38

केवायसीबाबत काही नियम बदलण्याची RBIची घोषणा

रिझर्व्ह बँकेनं ग्राहकाची ओळख पटवण्याच्या म्हणजे केवायसीबाबत काही नियमांमध्ये बदलांची घोषणा केली आहे.   नवीन नियमांनुसार एखाद्या ग्राहकानं बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल, तर त्याला त्याच बँकेत नवीन खातं उघडताना किंवा नवीन उत्पादन किंवा सेवा घेताना पुन्हा ओळखपडताळणीसाठी कस्टमर ड्यू डिलिजन्स म्हणजे सीडीडीसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नसेल.   बँकेनं ग्राहकांकडून कोणतीही अतिरिक्त किंवा सुधारित माहिती घेतल्यास ती केंद्रीय केवायसी नोंदणीकेंद्रात सात दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी, अ...

June 18, 2024 10:11 AM

views 39

वीजदेयकांसंदर्भात केवायसी फसवणूक प्रकरणी कारवाई

वीजजोडणी तसंच वीजबिलासंदर्भात ग्राहकांनी आपली माहिती अर्थात KYC अद्ययावत करावी अशा प्रकारची फसवणूक फोनद्वारे होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर दूरसंचार विभागानं नागरिकांच्या सुरक्षेसाठी कारवाई सुरु केली आहे. सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीमध्ये गैरवापर झाल्याच्या तक्रारी असलेले, देशभरातील ३९२ मोबाइल संचांच्या सेवा बंद करण्याचे निर्देश सर्व दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत.या संचांशी जोडलेल्या ३१ हजार ७४० मोबाइल कनेक्शनची पुन्हा पडताळणी करण्याचे निर्देशही दुरसंचार मंत्रालयानं दिले आहेत....