December 22, 2024 8:23 PM December 22, 2024 8:23 PM
12
भारत आणि कुवेत या देशांमध्ये विविध करार
येणाऱ्या काळात भारत आणि कुवेत यांचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज कुवेत दौऱ्यात कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह, युवराज शेख सबाह अल खालेद अल हमाद अल मुबारक अल सबाह आणि कुवेतचे प्रधानमंत्री अहमद अल अब्दुल्ला अल सबाह यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संरक्षण, सांस्कृतिक आदानप्रदान, क्रीडा याविषयीचे सामंजस्य करार आणि कुवेतला आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं सदस्यत्व देण्याविषयी करारांवर स्वाक्षऱ्...