December 21, 2024 8:23 PM December 21, 2024 8:23 PM
4
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कुवेत दौऱ्यावर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कुवेतला पोहोचले. कुवेतचे प्रथम उप-प्रधानमंत्री शेख फहाद युसुफ सौद अल सबाह यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. गेल्या ४३ वर्षांमधली भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. या भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ होतील, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. मोदी यांच्या स्वागतासाठी कुवेतमधला भारतीय समुदाय उत्साहानं विमानतळावर जमला होता. यावेळी प्रधानमंत्र्यांनी १०१ वर्ष...