October 31, 2025 6:56 PM October 31, 2025 6:56 PM
33
कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार ओडिया कवी हरप्रसाद दास यांना जाहीर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रसिद्ध ओडिया कवी हरप्रसाद दास यांना जाहीर झाला आहे. रोख एक लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असा या पुरस्काराचं स्वरूप असून त्याचं वितरण लवकरच होणार आहे. सन २०१० पासून सुरू झालेला हा पुरस्कार विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे एका अमराठी कवीला दिला जातो.