December 11, 2024 6:53 PM December 11, 2024 6:53 PM

views 3

कुर्ला बस अपघाताची चौकशीसाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक वाहतूक परिवहन मंडळाची चार सदस्यीय समिती स्थापन

मुंबईतल्या कुर्ला बस अपघाताची चौकशी करण्यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक वाहतूक परिवहन मंडळानं चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. चालकानं सुरक्षा नियमांच पालन केलं होतं की नाही किंवा बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता यासंदर्भातील चौकशी ही समिती करेल. तसंच अपघातातल्या मृतांच्या कुटुंबाना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी २ लाख रुपये देणार असल्याचं बेस्ट प्रशासनानं जाहीर केलं आहे. जखमींवरच्या उपचाराचा खर्चही बेस्ट करणार आहे. सोमवारी झालेल्या या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आणि ४२ जण जखमी झाले.