March 28, 2025 7:04 PM March 28, 2025 7:04 PM

views 5

Nashik KumbhMela : मंत्री गिरीश महाजन यांनी केली त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी

नाशिकमध्ये  त्र्यंबकेश्वर इथं २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन अनेक व्यवस्था नव्याने करण्यात येणार असल्याचं जलसंपदा, आपत्तीव्यवस्थापन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी आज त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.    कुशावर्ताप्रमाणेच त्र्यंबकेश्वरला नवं कुंड उभारून विविध घाटांचं  विस्तारीकरण, स्वच्छता यासाठी सर्व उपाययोजना करण्यात ये...

November 4, 2024 10:55 AM November 4, 2024 10:55 AM

views 9

13 जानेवारी पासून कुंभमेळा सुरू होणार

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना महाकुंभ मेळयासाठी आमंत्रित केले आहे. पौष पौर्णिमा स्नानाने महाकुंभाची सुरुवात होत आहे. 13 जानेवारी 2025 पासून हा कुंभमेळा सुरू होत असून या उत्सवाची सांगता 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटच्या स्नानाने होणार आहे.

August 19, 2024 1:35 PM August 19, 2024 1:35 PM

views 15

नाशिकमध्ये देशातला पहिला एआय कुंभमेळा

देशातला पहिला एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. या अनुषंगानं काल  नाशिकमध्ये तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या बिल्डथॉनचं, उद्धाटन विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्य शासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांवर आधारित सादरीकरण केलं. कुंभथॉनच्या अधिकृत संकेतस्थळाचं तसंच कुंभ मेळ्यासाठी समर्पित एआय - सक्षम चॅटबॉटचं उद्धाटनही करण्यात आलं.