July 19, 2024 5:14 PM July 19, 2024 5:14 PM
13
रायगड : कुंभे धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू
रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या अन्वी कामदार हिचा रील्स करताना पाय घसरल्याने दरीत पडून मृत्यू झाला; या दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनाने कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे. पोलीस प्रशासनानं धबधबे, नदी, धरण, डोंगर परिसरात जीव धोक्यात घालणारी हुल्लडबाजी (स्टंटबाजी) करण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.