October 16, 2025 3:27 PM

views 46

नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्यासाठी कॉंक्रीटीकरण करण्यात येणार

नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याचं  रूंदीकरण करून कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील दुकाने, हॉटेल्स आणि इतर  बांधकामं हटवण्याची मोहिम नाशिक महानगर विकास प्राधीकरणानं काल सुरु केली.    या विरोधात पिंपळगाव बहुला इथं  रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, नाशिक तालुक्यातील ३५ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुमारे दीडशे अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत , असे प्राधिकरणाने स्पष्ट केले.