March 3, 2025 3:01 PM March 3, 2025 3:01 PM

views 4

माउंटन वेस्ट इनडोअर ट्रॅक अँड फिल्ड अजिंक्यपद : कृष्णा जयशंकर हिला गोळाफेक प्रकारात कांस्यपदक

अमेरिकेत न्यू मेक्सिको इथे झालेल्या माउंटन वेस्ट इनडोअर ट्रॅक अँड फिल्ड अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कृष्णा जयशंकर हिने काल महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकलं. कृष्णा हिने १६ मीटर ३ सेंटिमीटर इतका लांब गोळा फेकत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम महाराष्ट्राच्या पूर्णा रावराणे हिच्या नावावर नोंदवलेला होता. तिने २०२३मध्ये १५ मीटर ५४ सेंटिमीटर इतका लांब गोळा फेकला होता. या स्पर्धेत कोलोरॅडो विद्यापीठाच्या मॅया लेन्सर हिने सुवर्ण तर तिची सहकारी गॅबी मोर्न्स ह...