October 23, 2024 8:36 PM October 23, 2024 8:36 PM
5
कृष्ण जन्मभूमी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
मथुरामधल्या शाही ईदगाह-श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी सर्व दिवाणी खटल्यांची एकाच वेळी सुनावणी घेण्याचे आदेश मागे घेण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. न्यायमूर्ती मयंककुमार जैन यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं न्यायालयीन कार्यक्षमतेचा हवाला देत या प्रकरणांची एकत्रित सुनावणी व्हावी असा निर्णय दिला. सर्व १८ प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेण्याच्या आदेशाचा फेरविचार करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती.