June 1, 2025 3:28 PM June 1, 2025 3:28 PM

views 8

मान्सूनचा प्रवास रखडल्यानं पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

बदललेल्या वातावरणामुळं मान्सूनचा प्रवास सध्या रखडलेला असून, १० जूनपर्यंत राज्यात पावसाचं प्रमाण कमीच राहाणार आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागानं विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांना दिला आहे. किमान १० जूनपर्यंत राज्यात बहुतांश भागात  हवामान कोरडं राहणार आहे. यामुळे तापमानात वाढ होणार असून, विदर्भात तापमान ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे.