July 22, 2025 6:25 PM July 22, 2025 6:25 PM
21
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ‘कृषी समृद्धी योजना’ जाहीर
राज्यातल्या शेतकऱ्यासाठी ‘कृषी समृद्धी योजना’ राबवण्याची घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज केली. या योजनेत शेती क्षेत्रात दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे. यासंदर्भात आजच शासकीय अध्यादेश जारी केला आहे, असं कोकाटे यांनी नाशिकमध्ये आयोजित वार्ताहर परीषदेत सांगितलं. कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं, उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादकता वाढवणं, पिकांमध्ये विविधता आणणं, मूल्यसाखळी बळकट करणं, तसंच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेत...