August 3, 2025 7:52 PM August 3, 2025 7:52 PM
5
रशियात ‘कामचटका’ द्वीपकल्पातल्या ‘क्रॅशेनिनिकोव्ह’ या ज्वालामुखीचा उद्रेक
रशियात ‘कामचटका’ द्वीपकल्पात असलेल्या ‘क्रॅशेनिनिकोव्ह’ या ज्वालामुखीचा आज उद्रेक झाला. गेल्या ६०० वर्षांत झालेला हा पहिलाच उद्रेक आहे. या उद्रेकामुळे समुद्रसपाटीपासून ४ किलोमीटर उंचीवर राखेचे ढग तयार झाले असून या परिसरातून जाणाऱ्या विमानांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या उद्रेकाचा संबंध काही दिवसांपूर्वी या भागात झालेल्या भूकंपाशी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.