January 6, 2025 8:31 PM January 6, 2025 8:31 PM
5
कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांना जाहीर
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे दिल्या जाणाऱ्या सन २०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात करण्यात आली. त्यात, प्रतिष्ठेचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कारासाठी, मुद्रित माध्यमातून लोकमत 'सातारा'च्या प्रतिनिधी प्रगती पाटील यांची, तर दृक् श्राव्य माध्यमातून 'एबीपी माझा'चे पुणे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांची निवड झाली आहे. वार्ताहर संघाचा उत्कृष्ट सदस्य पुरस्कार 'पुढा...