March 1, 2025 3:42 PM March 1, 2025 3:42 PM
30
कोयना परिसर पर्यटन हब बनविणार- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
सातारा जिल्ह्यातल्या कोयना परिसराला पर्यटन हब बनवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलत एमटीडीसी म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना रिसॉर्टचं आधुनिकीकरण आणि नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. कोयना पर्यटन विकासासंदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.