March 23, 2025 9:39 AM March 23, 2025 9:39 AM
2
वर्षभरात ग्रंथालयांचं आधुनिकीकरण होणार – पालकमंत्री नितेश राणे
जुनी ग्रंथसंपदा आणि साहित्य जतन करण्यासाठी आगामी वर्षभरात ग्रंथालयांचं आधुनिकीकरण करण्याचं काम शासनामार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हा साहित्य संमेलनाचं उदघाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक गंगाराम गवाणकर संमेलनाचे अध्यक्ष आहेत. ग्रंथ दिंडीने काल या साहित्य संमेलनाला सुरवात झाली.