May 26, 2025 3:41 PM May 26, 2025 3:41 PM

views 20

मुंबईसह कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस

महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि झारखंडमधे सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होत आहे.   महाराष्ट्रात मोसमी पावसाचं आगमन  नेहमीच्या वेळेच्या १० दिवस आधीच झालं असून कोकणात सर्वत्र तसंच सोलापूर, सांगली इत्यादी ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे.   राजधानी मुंबईत कालपासून वादळी पाऊस होत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. सकाळी कार्यालयात...

May 24, 2025 8:07 PM May 24, 2025 8:07 PM

views 14

कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.   दरम्यान, आज कोकणात पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही मॉन्सूनपूर्व पावसाचा जोर  कायम आहे.  गेल्या २४ तासात जिल्हयात  ५८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कणकवली तालुक्यात १३० मिमी पावसाची नोंद झाली.    रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सखल भागात पाणी भरलं आहे. रा...

March 1, 2025 12:17 PM March 1, 2025 12:17 PM

views 22

कोकणचा विकास आता थांबणार नाही -पालकमंत्री नितेश राणे

कोकणचा विकास आता थांबणार नाही असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. कोकण सन्मान या कार्यक्रमात देवगड इथे ते बोलत होते.   कोकणातील निसर्ग सौंदर्य, विविधता आणि खाद्य संस्कृती यांचं चित्रीकरण सामाजिक माध्यमातून जगामध्ये पोहोचवण्याचं कार्य करणाऱ्या कोकणातील रील क्रिएटर्सचा सन्मान कोकण सन्मान कार्यक्रमातून राणे यांच्या हस्ते करण्यात आला. ज्येष्ठ सिने नाट्य कलाकार विद्याधर कार्लेकर, ठाकर लोककला जतन करणारे पद्मश्री परशुराम गंगावणे आणि अखंड समाजसेवेचा व्रत घेतलेले दय...

February 25, 2025 3:25 PM February 25, 2025 3:25 PM

views 9

मुंबईसह कोकणात उष्णतेची तीव्र लाट

मुंबईसह कोकणात सर्व जिल्ह्यांमधे पुढचे तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या परिसरात तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. 

September 13, 2024 3:17 PM September 13, 2024 3:17 PM

views 18

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले मुंबईकर परतीच्या वाटेला

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले मुंबईकर आता परतीच्या वाटेला लागले आहेत. त्यामुळे माणगाव, इंदापूरसह मुंबई-गोवा महामार्गावरच्या अनेक शहरांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे,असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पाच दिवसांच्या गौरी-गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी कामावर रुजू होण्यासाठी मुंबईला परतत आहेत. त्यामुळे अनेक शहरात पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे.

August 25, 2024 6:22 PM August 25, 2024 6:22 PM

views 14

पुण्यातून कोकणात जाण्यासाठी विमानसेवा सुरू

पुण्यातून कोकणात जाण्यासाठी ३१ ऑगस्ट पासून विमानसेवा सुरू होत आहे. पुणे ते गोवा आणि पुणे ते सिंधुदुर्ग या दोन्ही मार्गांवर थेट विमानसेवा सुरू होत आहे. एका खासगी विमान कंपनीकडून शनिवार आणि रविवारी ही विमानसेवा सुरू असेल. 

July 31, 2024 7:08 PM July 31, 2024 7:08 PM

views 15

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी !

गणपती उत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता एसटी महामंडळानं यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४ हजार ३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांमधल्या प्रमुख बसस्थानकांमधून या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. या गाड्या आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यांचं आरक्षण बसस्थानकावर, किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे.   गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी बसस्थान...

July 20, 2024 11:24 AM July 20, 2024 11:24 AM

views 14

गुजरात, कोकण, गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर अतीवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने आज गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टी आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. केरळ, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, ओडिशा, विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.     तसंच मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात आगामी 4 दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, आज झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या प्रदेशात आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ...

July 17, 2024 3:45 PM July 17, 2024 3:45 PM

views 16

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पुढल्या ३ दिवसात अति मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पुढल्या तीन दिवसात अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड, केरळ, ओदिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढचे चार दिवस अति जोरदार पाऊस होईल.   हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, पश्चिम राजस्थान, जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तरप्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने कळवलं आहे.  

July 8, 2024 1:36 PM July 8, 2024 1:36 PM

views 22

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची हजेरी

मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.   मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई परिसरात काल सकाळी जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त असून, रेल्वे मार्गावरील साचलेल्या पाण्यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना अडथळा निर्माण होत आहे. पालघर जिल्ह्यातल्या उसगाव इथं पाण्यात अडकलेल्या १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात र...