August 21, 2024 9:43 AM August 21, 2024 9:43 AM
18
कोलकाता बलात्कार प्रकरण : पीडित महिलेचे समाज माध्यमावरील नाव, छायाचित्र काढावेत – सर्वोच्च न्यायालय
कोलकाता इथल्या महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणासंबंधी समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल पीडित महिला संदर्भातील नाव , छायाचित्र आणि व्हीडियो तत्काळ काढून टाकण्यात यावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे आदेश दिले. देशातल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय कृती दलाची स्थापना के...