August 24, 2024 7:55 PM August 24, 2024 7:55 PM

views 6

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआय ७ जणांची पॉलीग्राफ चाचणी करणार

कोलकात्यात राधागोविंद कार रुग्णालयातल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी विशेष तपास पथकानं तपासाची कागदपत्र केंद्रीय अन्वेषण संस्थेकडे सुपूर्द केली असून सीबीआय ७ जणांची पॉलीग्राफ चाचणी करणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचा त्यात समावेश आहे. सिएलदा न्यायालयानं दिली आहे. आतापर्यंत याप्रकरणी अटक झालेला एकमेव संशयित आरोपी संजय राय, तसंच घटनेच्या आधी  पीडितेबरोबर असलेले ४ डॉक्टर यांच्याही पॉलिग्राफ चाचण्या होणार आहेत. दरम्यान संजय राय ला काल १४ दिवसांची कोठडी काल देण्यात आली.  

August 20, 2024 6:58 PM August 20, 2024 6:58 PM

views 7

डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय कृती दलाची स्थापना

देशातल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाला तीन आठवड्यात हंगामी अहवाल आणि दोन महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाने आज दिले. या कृती दलात देशभरातल्या निवडक डॉक्टरांचा समावेश असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल याबद्दल ते सल्ला देतील. कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची  सुनावणी करताना  सरन्यायाधीश ...